Breaking
ई-पेपरकवितानागपूरबीडमराठवाडासाहित्यगंध

साखरपेरणी

राजश्री मिसाळ ढाकणे

0 4 8 2 9 0

साखरपेरणी

कर साखरपेरणी
घ्यावी मने तू जिंकून
थोरा मोठ्यांचा सन्मान
ठेव नाती तू टिकून….

नको विखारी ग शब्द
होतो मनावर वार
गोड बोलण्यात आहे
सुखी संसाराचं सार….

तुझ्या पदवीचा नको
उगी मनी अहंभाव
जरी अडाणी ग कोणी
नको त्याच्या मनी घाव…

तूच आहेस ग मुली
पूल सासर माहेर
ठेव जपून कायम
संस्काराचा ग आहेर…

तुझी साखरपेरणी
फळ मधूर येईल
माय बापाच्या कष्टाचं
खरं सार्थक होईल…

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे