Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

वाट; डाॕ.पद्मा जाधव-वाखुरे

छ.संभाजीनगर

0 4 8 2 9 0

वाट

अनोखा जमाना आजचा
वाट दाखवतोय गूगल
सगळेच फिरतात घेऊन
वाटाड्या म्हणून मोबाईल ..१

मोबाईल झाला वाटाड्या
वाटा कैक दाखवतोय
दूरची नी जवळची
वाट माणूस चोखळतोय ..२

आम्हाला दाखवली वाट
अनुभवी दृष्ट्या माणसांनी
म्हणून जगणे झाले सोपे
घडलो त्यांच्या सुसंस्कारांनी ..३

शेवटी वाट एकच आहे
दाखवण्याचे मार्ग निराळे
एकाला आधार तंत्रज्ञानाचा
दुसऱ्याला स्पर्श माणुसकीचा ..४

माणसांनी वाट दाखवली
माणुसकीची प्रचिती आली
जीवनाला दिशा मिळाली
जगण्याची परिपूर्ती झाली ..५

डॉ.पद्मा जाधव-वाखुरे
छ.संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे