
0
5
4
7
4
5
महामानव
भीम जयंतीचे आज ,देखावे करीत आहे।
स्वार्थासाठी भिमराया,तुला वापरीत आहे।।
वरवर करतात, आचरणाला भुलूनी।
भलतेच अनुयायी ,तसे भासवीत आहे।।
समाजात माणसांचे,रोजच भांडण दंगे।
आग हळूच लावूनी , गावं पेटवीत आहे।।
कैदखाणा जरी आहे,भरोसा मुळीच नाही।
पहारेकरीच जना , सदा फसवीत आहे।।
ज्ञान विज्ञानाने भले, शिकून सवरलेले।
तरी दगड मुर्तीच्या , पायाला धरीत आहे
भीम विचार वारसा,लाभला ईथे जगाला।
धर्म जाती भेदामुळे ,लोक कलंकित आहे।।
संविधान भारताचे,या विश्वाला तारणारे।
म्हणून सूर्य धरेचा ,आज प्रकाशित आहे।।
महामानव भीमानी ,जगायचे शिकविले।
शिका,संघर्ष,संघटीत विना वंचित आहे।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा. जि यवतमाळ
0
5
4
7
4
5



