0
4
8
2
9
0
नयनबाण
चालवू नकोस तू नयनबाण अफलातून
वीज ही चमकते मग माझ्या सर्वांगातून
धडधड वाढते माझ्या कशी काळजात?
प्रेम आहे का माझ्यावर तुझे अभिजात?
जमेल का तुला सोबत चालणे काट्यातून?
प्रेम फक्त करेन तुझ्यावर खरंच हृदयातून
सुख आणि समाधान देईन तुला खूप
बोल आज मोकळे राहू नको अशी चूप
पाहू नकोस माझ्या संयमाची तू कसोटी
समर्पित होऊन जगेन हिचं गं सचोटी
नयनबाण घुसता झालोय मी प्रेमवेडा
मिठीत अलगद येऊन भरव ना कंदी पेढा
लाखमोलाची झोपडी नाही गं काही भीती
तुझ्यासाठी कायपण फसवी नाही प्रीती
गालात नको हसू आहेस का सहमत सांग?
मागणी लगेच घालतो भरण्या तुझा गं भांग
विश्वासाचं नातं हृदयात मस्त असं रुजलंय
स्वप्नपूर्ती होताच समृद्धीनं घर मस्त सजलंय
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
==========
0
4
8
2
9
0



