
0
5
1
7
5
8
अनपेक्षित प्रेम
सप्तरंगांची उधळण
करी प्रेमाचे सप्तरंग
अनपेक्षित प्रेम तयाचे
जसे रंगवूनिया रंग
चिंब होऊनी प्रेम रंगी
बहुरंगी उजळला रंग
उधळण अनपेक्षित प्रेमाची
होतो तुझ्यात मी दंग
दाखवून सखे प्रेमरंग
हृदय माझे जिंकलेस
साजूक रूप दिसलं
रंग तुझे मनात दाटलेस
जुगलबंदीच्या खेळात
शब्दांचा पसरतो गंधात
प्रेम होताच डोळ्यात
आनंद अश्रू वाहतात
प्रेमात पडल्यानंतर तुला
भेटण्यास अधीर मन झाले
जेव्हा जेव्हा येते मला जाग
आठवून रम्य अश्रू हो आले
कुसुम पाटील
कसबा बावडा, जि.कोल्हापूर
0
5
1
7
5
8



