Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरविदर्भ

ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा

जेष्ठ नागरिकांकरिता एक वेगळे आयोगाची मागणी : सचिव अशोक कातुरे

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २ फेब्रु) श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ श्यामनगर नागपूर मंडळाचे सचिव अशोक कातुरे यांनी असे म्हटले की, देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या कितीतरी कोटीपेक्षा अधिक झाली असून अनेक ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती वाढती महंगाई, शासनाची दिरंगाई आणि उदासीनता यामुळे हलाखीची झाली आहे. कागदोपत्री योजना दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अनेक वर्षापासून होत असलेली स्वतंत्र जेष्ठ नागरिक मंत्रालय व आयोगाची मागणी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव अशोक कातुरे करीत आहे.

देशातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक आरोग्य सुरक्षितता नाही. जेष्ठ नागरिकांची समाज, कुटुंब यामध्ये उपेक्षा, अपमान, सातत्याने होत असतो. 20 % जेष्ठ नागरिक हे एकाकी आणि दुर्लक्षित जीवन जगत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या कल्याणासाठी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महामंडळ (एस्कॉन) आणखीही इतर प्रमुख संघटना आणि हेल्पेज इंडिया, सारख्या संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत.

यापूर्वी भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर केले होते. आणि प्रत्येक राज्य सरकारने स्वतंत्र राज्य धोरण जाहीर करावे असे संकेत दिले. आज एक दशकाहून अधिक कालावधी लोटला तरी विविध राज्यांमध्ये अजूनही धोरणे जाहीर झाले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या योजनांचा फारसा फायदा होतांना दिसत नाही. जेष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या जेरियाट्रिक सेंटरचा प्रस्ताव तयार आहे.

गेल्या काही वर्षापासून नागपुरात जेरीयाट्रीक सेंटर व्हावे. यासाठी जेष्ठ नागरिक मंडळाद्वारे मागणी होत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दर्शविली. त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी पत्रव्यवहार देखील केले आहे. तीन वर्षें आधी जिल्हाधिकारी समाजकल्याण आयुक्त यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मेडिकलचे अधिष्ठाता यांनी जेरीयाट्रिक सेंटरचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शहरातील काही ज्येष्ठ नागरिक संघटनांनी मेडिकलचे अधिष्ठता यांची भेट घेऊन या सेंटरचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेणाऱ्या सरकारने आता ज्येष्ठांच्या बाबत या निर्णयाची अंमलबजावणी करावी. असे म्हणत शहरातील सर्वच ज्येष्ठ नागरिक मंडळांनी शासनाला स्मरणपत्र द्यावी असे अशोक कातुरे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा च्यावतीने शासन निर्णय काढून राज्याचे सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. या शासन निर्णयात अखर्चित बाबींच्या शासन निर्णय आला नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. जेष्ठ नागरिकांच्या धोरणांचा अंमलबजावणी आणि शासनाचा सर्व विभागांमध्ये समन्वय असण्याची गरज आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे