Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील विजेत्यांच्या त्कृष्ट रचना’

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 6 8 0 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : सर आली धावून📘*
*🔸मंगळवार : २१/ जुलै /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सर आली धावून*

काळ्याकुट्ट ढगातून
सर आली हो धावून
झोपडीच्या पाण्यात
पुस्तके गेली वाहून…!!

अंधारात मला माझी
दिसत नव्हती ताई
म्हणून जोर जोराने
रडत होती माझी आई..!!

कडेवरती घेतलं होतं
आईने उचलून मला
ताई ताई हाक देत ती
शोधत होती ताईला..!!

आवाजाने गावातले
रस्त्यावर गोळा झाले
बॅटरीच्या उजेडात
त्यांनी आम्हाला पाहिले..!!

नदीच्या पाण्यामध्ये
झोपडी दिसेना झाली
बोलू लागले गावकरी
ताई पाण्यात बुडली..!!

सर आली धावून नि
माझ्या ताईला नेले
हसू आईच्या गालात
कधीच नाही फुलले..!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

सर आली धावून
अंगण गेले न्हाऊन
पाणी वाहिले रस्त्यावर
सगळे गेले पाहून

सर आली धावून
शाळेत साचले तळे
जमले त्याभोवती सगळे
पाहू लागले बगळे

सर आली धावून
रान गेले आनंदून
वडाखाली बसले सगळे
गेले कसे गप्पात रंगून

सर आली धावून
नदी लागली वाहू
पाण्यात सोडली बोट
आनंदाने लागले पाहू

*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून….*

सर आली धावून रे
सर आली धावून…
होडी गेली वाहून रे
आपली होडी गेली वाहून….

कोवळसार उन्हात,
पाऊस कसा पडतो…
हळूच मग डोकावून,
इंद्रधनु का रे हसतो….

कागदाची होडी,
किती छान छान…
पावसात डोलते कसे,
हिरवे हिरवे पान…

पावसाच्या सरी,
होडीवर रे पडती….
होडी वाहून जाता,
मित्र माझे हे रडती….

नका नका रे रडू,
पुन्हा नव्याने होडी सोडू…
कागदाची ती होडी,
बालपणात असते खूप गोडी….

*शैलेश शिवाजीराव गायकवाड*
*विंचूर, नासिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

सर आली धावून
पक्षी गेले उडून
पावसाच्या धारेने
रान गेले भिजून

चिव चिव करून
चिमणी पळाली
काव काव करत
कावळा मागे आला

सर आली धावून
मोराने पाहिले थांबून
थुई थुई नाचला
पिसारा फुलविला

सर आली धावून
राघू मैना गेले गाऊन
मोठ्या मोठ्या थेंबानी
ते गेले पळून

ढग वाजले जोरदार
विज गेली चमकून
सर आली धावून
वेली गेल्या शाहारुन

मीही गेलो अंगणात
सरी घेतल्या अंगावर
पाऊस आला जोरात
पळून आलो घरात

*गजवंती सुभाष विघ्ने*
*बडनेरा अमरावती,*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सर आली धावून*

सर आली धावून
मुले गेली भिजून
सरीवर सर थंडगार
अंग गेलं थरथरून ॥१॥

मुलांनी केली कमाल
कागदी-बोटी सोडून
मजा-मस्ती धमाल,
केली साऱ्यांनी मिळून॥२॥

हिरव्या हिरव्या वेली
त्याला,रंगी-बेरंगी फुले
खेळ खेळु त्यांच्या सोबत
आपण सारी मुले ॥३॥

पुन्हा,ढग येऊन भरून
वर्षा आली धावून
गेली ओलेचिंब करून
मुले गेली घाबरून ॥४॥

नदीला आला पूर
पाहू लागले सारे
झाला पावसाचा कहर
दृष्य दिसू लागले न्यारे ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

आला आला पाऊस
चल गण्या करू मजा
आज सुट्टी असल्याने
नाही होणार मला सजा.. १

कागदी होडी घेऊया
तिला पाण्यात सोडुया
तिच्या मागे आपण
सारे पाण्यात पोहूया…२

सर आली धावून
होडी गेली वाहून
सारी मुले तिच्याकडे
राहिली फक्त पाहून…३

पाऊस आला जोराचा
गाणे गाऊ पावसाचे
ताल धरून नाचू सारे
दिन आज सोनियाचे…४

झाली हिरवी राने
बेडकांचे ऐकतो गाणे
निसर्गाचे रुपडे पाहून
आनंदली मानव मने…५

पावसात सारे नाचूया
गोल गिरक्या घेऊया
निसर्गाचा बदल सारे
डोळे भरून पाहूया…६

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

येरे येरे पावसा
ढगाआड लपलासा
सर आली धावून
होडी गेली वाहून

सुगंध मातीचा चोहीकडे
वरती खाली मोद भरे
स्रृष्टी झाली ओली चिंब
पाण्यात दिसे प्रतिबिंब

गीत गाती सारी मुले
गालावरती हसू फुले
ओलेचिंब होऊ सारे
नभात लुक लुक करी तारे

गडगडाट ढग हे करीती
कडकडाट झाली विज
सर आली धावून
आम्ही गेलो न्हाऊन

मुले आली धावून अंगणी
हसत खेळत गाती गाणी
सर सर येई सरी
मुले चिंब झाली सारी

*श्री.पुरुषोत्तम वि.ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

सर आली, आली धावून
गेली, गेली गाणी गाऊन…..

चिंब झाली सारी मुले
रानफुलही मस्त फुलले…

ढग टाळ्या वाजवती
विजा चमचम चमकती…

गार वारा सो सो सुटला
मुलांचा नाच सुरू झाला…

चिऊताईने चिवचिवाट केला
मयुराने पिसारा फुलवला….

बेडूकाने डराव डराव म्हटले
माकड उड्या मारू लागले…

कागदाची छान नाव करूया
पावसाच्या पाण्यात सोडूया…

पाऊस आला,पाऊस आला
झाडे आपण लावूया चला…

झाडे छानच उगवतील
फळे, फुले, धान्य देतील…

शेतकरी येईन आनंदात.
पावसाने आनंद पेरला जगात…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

मेघ दाटले नभी
टपटप थेंब धरेवर
सर आली धावून
सर्वांनी गाठले घर

सर आली धावून
केले चिंब सर्वांना
सरीत न्हाले अंग
आनंद हा भिजताना

सर आली धावून
घाण नेली वाहून
स्वच्छ झाला परिसर
खुश झाले चराचर

सर आली धावून
पूर आला दाटून
आनंदित बळीराजा
पशुपक्षी गेले न्हावून

ये ग ये ग सरी
नियमित धरेवरी
आनंद हा उरी
तुझ्यासवे मैत्री खरी

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

काळा ढगांच्या सावटात
सर आली धावून
चिंबचिंब पावसाच्या सरीत
मुले गेली न्हाऊन

रिमझिम रिमझिम सरीत
मुले पावसात भिजु लागली
डबकी,नदी,नाल्याच्या ओघळात
कागदाच्या होड्या सोडू लागली

धो धो सर आली धावून
आईनं गरमागरम भजी केले
वाफाळलेल्या भज्या पाहुन
मुलांच्या तोंडाला पाणी सुटले

होता कडकडाट,लखलखाट
सारी मुले घाबरुन गेली
घाबरगुंडी उडता क्षणी
मुले आईच्या कुशीत शिरली

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

ये गं ये गं सरी
सर आली धावून
झाडे वेली पक्षी
निघाले सारे न्हाऊन

सारे मित्र मिळून
सोडू पाण्यात होड्या
राग येईल सरीला
नको करुस खोड्या

पावसाच्या सरीत
चिंब चिंब होऊ
तुषार उडवीत
पाऊसगाणे गाऊ

रोज रोज बरसून
मिळू दे शाळेला सुट्टी
मग मात्र मी
करेन तुझ्याशी गट्टी

तुझ्याविना नदीनाल्यांना
पडेल गं कोरड
खेळायला मिळालं नाही म्हणून
मग आम्ही करू ओरड

*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

सर आली धावून बघा
टिप टिप गात गाणी..
थेंब थेंब करतं पसरते
अंगणभर पावसाचे पाणी..

सर आली धावून तसेच
बेडूक दादा करी डराव डराव..
हिरवा, पिवळा कोट घालून
दिसतो की तो जॅटलमन राव…

सूर्यबाप्पा ही चिंब भिजून
वाटे गारठला बिच्चारा…
त्यांचा भोवती पिंगा घालतो
पाऊस अन् गार गार वारा..

पाऊस येतो रिमझिम रिमझिम
नभात इंद्रधनुची दिसे कमान…
रानात क्याॅव,क्याॅव आवाज करतं
नाचरा मोर दिसतो किती किती छान…

सर आली धावून,सर आली धावून
पळा पळा रे खेळायला सारी..
कागदी होडी, पाण्यात उडी
मज्जाच मज्जा करूया पावसात भारी..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

ये ग ये ग सरी
सर आली धावून
टपटप थेंबांनी
आंगण गेले न्हाऊन

चिऊताई नाचू लागली
मोर पिसार फुलवतो
बेडूकदादा डराव डराव
उड्या मारत गाणे गातो

सरीने भिजली माती
त्याला सुगंधाची जोड
झाडे झाली हिरवीगार
फुले हसली गोड गोड

कागदी होडी बनवून
पाण्यामध्ये सोडली
आम्ही मुले सारी
मजामस्तीत रमली

सर येता भूवरी
आनंद घेऊन आली
निसर्गाच्या कुशीत
बालमैफल रंगली

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

सर आली धावून
टप टप थेंब पडले
सर्वत्र पाणीच पाणी
नदी,नाले,ओढे भरले

पोरांनो खिडकीतून बघा
बाहेर पाऊस कसा नाचतेय
झाडं, फुलं, शेतं सगळी
धरती आई खुश दिसतेय

आकाश,ढग, कागदाची होडी
मुलांनी पावसाच चित्र काढलं
चित्रात सुंदर सुंदर रंग भरून
कागदावर निसर्ग जणू फुलवलं

सर म्हणाली भिजू नका जास्त
पण पावसाचा आनंद घ्या
निसर्गाला वाचवा झाडं लावा
पाणी अडवा, पाणी जिरवा

सर आली धावून पावसात
आम्हाला पावसाने दिलं ज्ञान
एका दिवसात आम्ही शिकलो
पाऊस म्हणजे आहे जीवन

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿
*सर आली धावून*

सर आली धावून,
टपटप थेंब घेऊन,
ढग म्हणाला हसत,
“चला भिजूया येऊन!”

चिमणी म्हणे, “थांब!”
पंख झाले ओले,
काऊ म्हणे, “काव!”
पाणी पडले भोवळे.

कागदी ती होडी,
निघाली गं गात,
बेडूक दादा म्हणे,
“ये माझ्या सोबत!”

मोर नाचे फिरत,
पिसारा रंगला,
इंद्रधनू हसत,
आकाशी डोकावला.

सर आली धावून,
आनंदाची राणी,
भिजलो सारे मिळून,
हसली दुनिया सारी.

*मनोज परसराम शिंदे*
*ता पालम जिल्हा परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦🌈💦➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 8 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे