अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचे नुकसान; लाख रुपयाचे परीश्रम मातीमोल
भिमराव मेश्राम, जिल्हा प्रतिनिधी भंडारा
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचे नुकसान; लाख रुपयाचे परीश्रम मातीमोल
तोंडचा घास हिरावल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात; पंचनाम्याची मागणी
भिमराव मेश्राम, जिल्हा प्रतिनिधी
भंडारा: संततधार पावसामुळे साकोली तालुक्यातील सिरेगाव/बांध येथील हेमंत कापगते ह्या शेतकऱ्याचे शेतीसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला हा तोडणीला आला आहे. अशा अवस्थेत अवकाळी पावसाने भाजीपाल्याची शेती अक्षरशः नेस्तनाबूत ठरली आहे. प्रशासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी सरिगाव/बांध येथील शेतकरी हेमंत हिरामण कापगते ह्या शेतकऱ्याने केली आहे.
ग्राम सिरेगाव बांध येथील शेतकरी हेमंत हिरामण कापगते यांच्या शेतात कारले, चवळी, दोडका, वांगे ह्या भाजीपाला पिकाची संपूर्ण एका एकरात लागवड केली होती. परंतु ऐन भाजीपाला तोडणीच्या वेळी आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने संपूर्ण भाजीपाला पीक हा जमीनदोस्त केला आहे. ह्यामुळे सिरेगाव/ बांध येथील शेतकऱ्याचे तीन ते चार लाखाचे नुकसान झालेले आहे. सदर तरुण हा सुशिक्षित बेरोजगार असून, याच बेरोजगारीमुळे आपली वडीलोपार्जित शेतीत भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असतो. परंतु या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकऱ्याला प्रचंड मोठे नुकसान सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सिरेगाव बांध येथील शेतकरी हेमंत कापगते यांनी केली आहे.
माझ्या एक एकराच्या शेतामध्ये कारले, दोडका, चवळी, वांगे अशा प्रकारचे भाजीपाला पीक लावले होते. ऐन भाजीपाला काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आला, आणि या अवकाळी पावसामुळे संपूर्ण भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मी एक सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे याच बेरोजगारीमुळे आपली वडीलोपार्जित शेतीमध्ये दरवर्षी भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असतो. तर यावर्षी या अवकाळी पावसाने भाजीपाला पिक हा संपूर्ण जमीन दोस्त केला असल्याचे हेमंत हिरामण कापगते (शेतकरी, सिरेगाव बांध) यांनी आमचे प्रतिनिधी भीमराव मेश्राम यांना सांगितले.





