Breaking
अलिबागई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

जे. एस. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश.

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 3 0 0

जे. एस. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश.

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार दि. ५ मे २०२५ रोजी जाहीर झाला. यामध्ये जे. एस. एम. महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा सरासरी निकाल ९७.६४ % आणि कला शाखेचा सरासरी निकाल ८२.३५ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून थळे विघ्नेश अनिल या विद्यार्थ्याने ९५.८३% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कला शाखेतून कु. कंटक मानसी कमलाकर व कु. नाईक भार्गवी प्रकाश या विद्यार्थिनीनि ७२.३३% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयाचा संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान शाखा – मोरे मनस्वी सुनील ९३.६७% – द्वितीय क्रमांक, साखळकर आदित्य अरविंद ८७.५०% – तृतीय क्रमांक. कला शाखा- म्हात्रे विवेक धनंजय ७०.५०% द्वितीय क्रमांक, पाटील कशिश निलेश ६२. ३३% -तृतीय क्रमांक. तसेच महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील बारा विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता श्रेणी प्राप्त केली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्याना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, पर्यवेक्षक श्री. अजय सावंत आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील यांच्या शूभहस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. सौ. साक्षी पाटील, सचिव श्री गौरव पाटील, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, पर्यवेक्षक श्री. अजय सावंत व सर्व प्राध्यापकांनी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे