
0
4
8
2
8
4
झेंडा वंदन
शाळेत चालली लगबग लगबग
स्वच्छता करायला लागली मुलं
रांगोळी घातली पटांगणात
हार बनवायला आणली फुल
पाहुणे आली पटापट शाळेत
मुले आली स्वच्छ गणवेशात
शाळा,आफीस,महाविद्यालयात
झेंडा वंदन साजरा झाला आनंदात
बाबासाहेबांच्या प्रतिमेच पुजन
मुलांची कवायत भाषणे झाली
पाहुण्यांनी मुलांचे कौतुक केले
देशभक्तीपर गीते मुलांनी गायली
क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच
लहरतोय तिरंगा अपूला गगणात
बाबासाहेबांनी घटना लिहून सर्वांना
हक्क,अधिकार बहाल केले संविधानात
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल, जि.चंद्रपूर
0
4
8
2
8
4



