Breaking
आरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रपुणे

‘आदित्य नाईक’ यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत वृक्षारोपणासाठी झाडांचे वाटप

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 6 2 7 9 7

‘आदित्य नाईक’ यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत वृक्षारोपणासाठी झाडांचे वाटप

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

उरुळी कांचन, (दि १५) : वसुधा फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वसुधा नाईक यांचे सुपुत्र आदित्य नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेला झाडे भेट देण्यात आली.

पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांना समजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत प्रत्येकाने वृक्षलागवड करून लावलेल्या झाडांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

या प्रसंगी वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा सौ वसुधा नाईक, गौरव पुंडे, योगेश हरणे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच काही विद्यार्थी उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 7 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे