
0
4
0
9
0
3
एक थेंब
एक थेंब आकाशातून
अलगद आला हातावर,
ऐटीत बसला गोड हसला
उत्तर देशील का माझ्या प्रश्नावर..!!१!!
पाऊस येत नाही म्हणून
मानवा निसर्गाला कोसतोय,
विचार आपल्या मनाला
जंगल झाडे कोण कापतोय ?..!!२!!
पर्यावरण, जल ,वसुंधरा दिन
सारं काही साजरे करताय,
उष्ण तापमान वाढीला सांगा
जबाबदार कोणाला धरताय ?…!!३!!
एक पेड मा के नाम
आता जाग आली,
विकासाच्या नावावर
निसर्गाची कत्तल कोणी केली ?..!!४!!
कापू नका, जगवा जंगल, झाडी
फेकू नका ,जपून वापरा पाणी,
निसर्गाची साथ लागेल पदोपदी
नाहीतर मानवा होईल तुमचीच हानी..!!५!!
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर, गोंदिया
=========
0
4
0
9
0
3





