0
4
8
2
9
0
ओळख
इंद्रायणी मुळा -मुठा
गोदावरी भिमा कृष्णा
चंद्रभागा गंगा यमुना नदी
उंच पर्वत डोंगरमाथा
उगम पावते रुप निर्झर
कधी शांत स्मित हास्य
खळखळाट करते सुहास्य
काळ्या खडकातले जल
परि मन शुभ्र निर्मल
सदैव मार्ग शोधी
खोल गती गाभ्यात
खाचखळगे काटेरी झुडपे
खडकाळ गोटे दगड
संथ कधी रौद्ररूप धारण
विघ्ने अनेकपार करत
कुणाची ना करी प्रतिक्षा
गावोगावी देते आपली ओळख
सुनीता पाटील
जिल्हा अहिल्यानगर
=========
0
4
8
2
9
0



