आशा वर्कर करणार 12 फेब्रुवारी रोजी 1 दिवसीय संप
सकाळी 11 वाजता खंडोबा देवस्थान , सुभाष रोड येथून सिटूचा विशाल मोर्चा
आशा वर्कर करणार 12 फेब्रुवारी रोजी 1 दिवसीय संप
सकाळी 11 वाजता खंडोबा देवस्थान , सुभाष रोड येथून सिटूचा विशाल मोर्चा
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि ४) :आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यु ) नागपूर जिल्हा कमिटीची मीटिंग सिटू आशा युनियन कार्यालय, सुभाष रोड येथे पार पडली. 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी कामगार संघटना संयुक्त कृती समिती च्या विविध मागण्यांना घेऊन शेतकरी, शेतमजूर व कामगार यांचा 1 दिवसीय संप आयोजित करण्यात आलेला आहे.
नागपूर येथे संविधान चौकात 12 फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलनात सामील होण्याकरता सकाळी 11 वाजता खंडोबा देवस्थान सुभाष रोड येथून जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक मोर्चामध्ये सामील होणार. सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन 26 हजार रुपये देण्यात यावे, रिटायरमेंट ची वय 65 वर्ष, रिटायरमेंट नंतर पाच लाख रुपये ग्रॅज्युटी व दहा हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावे. या मागण्यांना घेऊन एक दिवसीय देशव्यापी संप करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने आशा वर्कर व गटप्रवर्तक सह विविध क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, शेतकरी व शेतमजूर वरील आंदोलनात सामील होण्याची अपील करण्यात आलेली आहे.
थकीत मानधनाच्या विषयावर केंद्र व राज्य शासना सोबत पत्र व्यवहार करून करण्यात येणार असून केंद्र शासनाकडून मासिक पांच हजार रुपये मानधन मिळवण्याकरता प्रयत्न करणार. स्थानिक स्तरावर विविध कामाचा बोजा आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचेवर महानगरपालिका व जिल्हा परिषद तर्फे विविध स्थानीय काम विना मोबदला करून घेण्यात येत असल्यामुळे पाच हजार रुपये महिना मिळावा याकरता चर्चा करणार. वरील निर्णय आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी यु च्या नागपूर जिल्हा कमिटी मीटिंगमध्ये घेण्यात आल्याची सूचना अध्यक्ष काँ. राजेंद्र साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिली. जिल्हा कमिटी मीटिंग ला कॉ.प्रीती मेश्राम, कॉ.लक्ष्मी कोतेजवार, कॉ. माया कावळे सह मोठ्या संख्येने आशा वर्कर उपस्थित होत्या.



