
0
4
8
2
8
6
तुझ्या मिठीत
तुझ्या मिठीत प्रिये,
स्वर्ग सुख लाभते…
तन मन सारे हे,
हर्षोल्लासीत होते…१
बघतच राहतो,
तुझे मोहक रूप…
सौंदर्यात भाळले,
काळीज गुपचूप…२
गाल गुलाबी तुझे,
नि त्यावरची खळी…
जीवा लावते घोर,
नाक ते चाफेकळी…३
ओठ लाल लाल ते,
गुलाबाची पाकळी…
नाजूक देहबांधा,
वाटे शेंग चवळी…४
पाठीवर केसांची,
सळसळे नागिण…
हृदय चोरले तू,
बनुनिया डाकिण…५
रंगरूप चेहरा,
करी घायाळ जीव…
तुझ्या आठवणीत,
मन हे कासावीस…६
तळमळतो प्राण,
आतुर तुझ्या भेटी…
गहिवरल्या मना,
छळशील तू किती?…७
तुझ्या स्पर्शाने झाला,
देह हा रोमांचित…
सुधाकरा सर्वदा,
लाभो संग हा नित…८
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
=========
0
4
8
2
8
6



