चला गावाकडे
कुसुमलता दिलीप वाकडे
चला गावाकडे
आपण शिक्षक तसेच लेखक असल्यामुळे पुस्तकाची जाणीव असते, पण ते कितपत. माझे भाऊजी मराठी तसेच भारतीय रंगभूमीवरील प्रयोगशील विचरवंत नाटककार म्हणून सुपरिचित असलेले ‘प्रेमानंद गज्वी’ यांनी आतापर्यंत बारा एकांकिका आणि बारा नाटके लिहिली आहेत. ‘घोटभर पाणी’ ‘देवनवरी’ , किरवंत, तन माजोरी, गांधी आंबेडकर, अभिजात जंतू, ही भाऊजींची नाटकं महाराष्ट्राच्या विविध विघापीठांतून बी.ए. तसेच एम.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहेत. ‘तनमाजोरी’ या नाटकाचा प्रयोग 1985 मध्ये लंडन येथे झाला.मराठी नाटयसृष्टीतील तसेच सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते तन- माजोरी मध्ये नाना पाटेकर, गांधी-आंबेडकर मध्ये भक्ती बर्वे-इनामदार ,किरवंत मध्ये डाॅ.श्रीराम लागू यांनी नाटकातून प्रमुख भूमिका केल्या आहेत.
28 डिसेंबर 2024 ला भाऊजीची कर्मभूमी असलेल्या नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड तालुक्यातील कारगाव येथे “बोधी द नाॅलेज हाऊस ” या ग्रंथालयाचे उद्घाटन महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खाडेकर यांचे हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. मुंबईसारख्या महानगराकडे स्थायिक होणारी माणसे खेड्याकडे परत येत नाहीत, परंतु गज्वी यांनी परंपरेला छेद देत आपल्या गावातील नव्या पिढीसाठी हा प्रेरणादायी प्रकल्प उभा केला आहे. असे मत या प्रंसगी खांडेकर यांनी व्यक्त केलेत. ” बोधी द नाॅलेज हाऊस “ही केवळ ग्रंथालय न राहता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच वाड्मयकला व नाटयकलेच्या विकासासाठी विशेष उपक्रम राबविणारी एक महत्त्वपूर्ण संस्था ठरेल असा ही विश्वास खांडेकर यांनी व्यक्त केला.
यांप्रसगी नाट्यदिग्दर्शक निलकांत कुलसंगे, कवी इ.मो.नारनवरे, बरीच नामवंत व्यक्ती, कारगाव येथील नागरिक तसेच नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रमात प्रेमानंद भाऊजीनी मला बोधी कला- संस्कृती हा ग्रंथ स्नेहपूर्वक भेट दिला. ग्रंथालयाच्या स्थापनेमुळे कारगावमध्ये साहित्य आणि कलाक्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर