0
4
8
2
9
7
ऋण मातीचे
बहुमोल हे ऋण मातीचे
मानावे किती आभार
भारवाही देहाला कैकदा
लाभला तिचाच आधार
तिच्याच कुशीत जन्म
तिनेच केला उद्धार
मातीची मायाच न्यारी
महिमा तिचा अपरंपार
या मातीचा टिळा
रोज भाळी लावावा
तीच माय माऊली
दूर करील थकवा
अन्नदात्री तीच असे
सोडवी प्रश्न पोटाचा
चुंबून घ्यावी धूळही
स्पर्श व्हावा ओठाचा
मातीच्या कणाकणातून
सुगंध असा पसरतो
अंतीम समयी देह बापडा
इथेच आपला विसावतो
पांडुरंग एकनाथ घोलप,
रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे
=========
0
4
8
2
9
7



