Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनधाराशिवमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

माझे गुरुवर्य

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर उमरगा, जि. धाराशिव

0 6 1 1 8 5

माझे गुरुवर्य

अवघड गणित सोपे करून,
ज्ञानाची वाट दाखविली,
अंकांच्या त्या विश्वामध्ये,
जीवनाची दिशा शिकविली…!
आपल्या शिकवणीच्या संस्कारांनी,
माझ्या स्वप्नांना पंख मिळाले,
आपण दिलेल्या ज्ञानामुळेच,
मी आज गणित शिक्षक झालो…!
इतकेच नाही गुरुवर्या,
आपल्या विचारांची साथ लाभली,
महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मंडळ, पुणे
याच्या सदस्यत्वाची संधीही मला मिळाली…!
ज्येष्ठ कवी… आदर्श गुरुजी…
ज्ञानेश्वर विद्यालयाचे निवृत्त पर्यवेक्षक,
ज्ञानदानासोबत शब्दांतूनही,
जपता संत तुकारामांचा विचार सुंदर!
नित्य अभंगांच्या रचनेतून,
तुकोबांची आठवण करून देता,
शब्दांच्या ओंजळीतून तुम्ही,
संस्कारांची गंगा वाहता…!
गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नसतो,
तो आयुष्याला आकार देणारा असतो;
माझ्या आयुष्याला गणिताची दिशा देऊन,
माझ्या यशात स्वतःचे प्रतिबिंब पाहणारा
माझा गुरुवर्य म्हणजे आपणच…!
आपल्या चरणी कृतज्ञतेची,
ही शब्दफुले अर्पण करतो,
आपले आशीर्वाद सदैव लाभोत,
हीच मनोमन प्रार्थना करतो…!
मा. हिराचंदजी देशमाने सर,
आपणांस वाढदिवसानिमित्त
हार्दिक अभिष्टचिंतन!!!
आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य लाभो,
लेखणीतून ज्ञान-अभंगांचा सुगंध दरवळत राहो,
आणि आपल्या मार्गदर्शनाने
असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात
ज्ञानाचा दीप सदैव तेवत राहो…!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
उमरगा, जि. धाराशिव
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे