0
4
8
2
9
0
कुंडीतील फूल
बगीच्यात आज
उमलली होती फुले
बघून त्यांना आम्ही
आनंदात सर्व मुले
बघत होती सदाफुली
टकमक एकमेकांकडे
निळ्याशार रंगांनी
लक्ष वेधले स्वतःकडे
तिकडून आली जुई
अन् बघा तिची घाई
आधार घेत इकडून
भराभर चढत जाई
तिकडून डोकावतो
गुलाब आमचा देखणा
काटेरी वर्ण जरीही
अकडतो बघ पाहुणा
स्मित हास्यात हसले
कुंडीतील फूल धवल
नाव त्याचे तो सांगेन
यातच वाटे आम्हा नवल
माधुरी काळे
वणी जिल्हा यवतमाळ
0
4
8
2
9
0



