अवैध गांजा विक्री कारवाई; Lcb नागपूर ची सिने स्टाईल कार्यवाही
शहर प्रतिनिधी नागपूर
अवैध गांजा विक्री कारवाई; Lcb नागपूर ची सिने स्टाईल कार्यवाही
शहर प्रतिनिधी नागपूर
बुट्टीबोरी / टाकलघाट :- दि.13/09/2025 रोजी पोलीस ठाणे MIDC बोरी परीसरात NDPS पथक,ना.ग्रा पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर खबर दिली कि, टाकळघाट गांगापुर झोपडपट्टी येथे राहणारी महिला नामें सौ.निलु आकाश कारमोरे , वय 30वर्ष, रा. गागांपुर , टाकळघाट, ता. हिंगणा, पो.स्टे. MIDC बोरी ही तिचा साथिदार नामें नागेश विलास पिल्लेवान वय 25 वर्षे रा.टाकळघाट ता.हिंगणा यांचे मदतीने तिचे राहते घरी अंमली पदार्थ गांजा विक्री करते. अश्या प्राप्त खबरेची शहानिशा करणेकामी NDPS पथकाने पोस्टे MIDC स्टाफसह सापळा रचुन कारवाई केली असता आरोपी महिलेच्या घराची झडती घेता 861 ग्रॅम अंमली पदार्थ गांजा, कि. 8500/- रु किचा अंमली पदार्थ, गांजा विक्री तुन मिळालेली रक्कम 6000/,वाहतुक कामी असलेली मोपेड किं 90,000/- असे एकुण 1,04,500/- रु.किचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . नमुद आरोपीं विरोधात विरोधात MIDC पोस्टेस अप क्र 379/25 कलम 8 क ,20 ब (ii)(अ),29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपींना अटक करण्यात आलेली असुन पुढील तपास पोउपनि मुन्ना सिंग ठाकुर करीत आहेत .
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक सा नागपुर ग्रा.,मा.अप्पर पोलीस अधीक्षक सा.ना.ग्रा ,मा.सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी ना.ग्रा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अजितसिंग देवरे , सपोनि भोयर ,पोउपनि भिमटे , पोहवा / प्रविण देव्हारे , पोहवा / अमॄत किनगे , पोहवा अमोल नागरे, पोहवा /1814 प्रफुल्ल राठोड ,पोशि / 2282 राजकुमार सातुर,मपोशि/829 प्रियंका गाडगे यांनी केलेली आहे.





