Breaking
कवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

जीवन

गोवर्धन तेलंग पांढरकवडा.जि, यवतमाळ

0 6 1 1 8 5

जीवन

जीवन जगणे मी ,असे सोपे केले !
पक्षापरी काडी वेचून , खोपे केले !!

त्सुनामी वादळाला रोखेन मी नक्की !
कर्माला रुजवून , सुंदर रोपे केले !!

शत्रूशी झुंजाया ,भीती मनी नाही !
धैर्याने स्वतःला ,’तात्या टोपे’ केले !!

मानवता माझी ही ,वाट जीवनाची!
दुष्टांना ठोकरून , मार्ग सोपे केले !!

रुढी परंपरांना ,त्या फेकून दिल्या !
मनूला या जगातून ,आता लोपे केले!!

पुरोगामी आम्ही, खुशाल नांदतो !
सनातनी विचारांना, आता झोपे केले !!

जो विसरे माता ,त्याचे बरे नाही !
निसर्ग पृथ्वीने , तेव्हा कोपे केले!!

गणगोत माझे हे ,सोबतीला आहे !
गोवर्धन मी अन् ,सारे गोपे केले !!

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि, यवतमाळ
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे