Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरपरीक्षण लेखभंडारासाहित्यगंध

फारकत

कु.संगिता रामटेके/भोवते

0 4 8 2 9 3

फारकत

मामा : हॅलो
चरणदास : हॅलो , मी सायलीचा बाबा बोलतोय.
मामा : हां, बोला ना.
चरणदास : मी सायलीला तिच्या सासरहून परत घेऊन आलो.
मामा : का? काय झालं?
चरणदास:-सकाळीच पोरीचा फोन आला होता. खूप रडत होती. खूप मारलं म्हणे जावयानं. जावयांना फोन लावला तर ते ही उलट बोलले. म्हणत होते घेऊन जा आपल्या मुलीला. म्हणून तडक गेलो आणि घेऊन आलो घरी.
मामा : मुलीची चूक विचारली का तुम्ही. आता कुठे वर्ष -दीड वर्ष झालंय लग्नाला. मुलीला घरी आणण्याआधी दोघांनाही समोरासमोर बोलायचं ना? ठीक आहे. मी बोलून बघतो त्यांच्याशी.
चरणदास : आणखी एक गोष्ट आहे. सायलीला दिवस गेलेत. तरी जावई तिच्यावर हात उगारतो, मी तर फारकत घ्यावी की काय, या विचारात आहे.’

ही आहे आजकालच्या शंभर पैकी वीस टक्के लोकांची व्यथा. पूर्वीचे लोक मुलीला एकदा सासरी पाठवणी केली की, ती तेच तिचे घर आणि तिथेच तिचे प्राक्तन असे समजून आई वडील तिलाच सहन करण्यास सांगायचे. क्वचितच एखादे वडील जावयांची कानउघाडणी करायचे. मुलगी सुद्धा आईवडीलांना चिंता नको म्हणून सहन करत राहायची. परंतु आता काळ बदलला आहे. सध्याचं समाजमन मुलांबाबत जास्त हळवं, कोवळं झालं असं वाटतं. मुलांना हलकीशी झालेली दुखापतही खूप मोठी वाटते. त्याचं कारण कदाचित एक किंवा दोनच अपत्य असणे हे असेल. सध्या आई वडिलांना वाटते मी माझ्या मुलांना सर्व सुख दिले पाहिजे. परंतु यामुळे कधी जर याच मुलांना मनासारखे मिळाले नाही तर त्रागा करतात, नैराश्य येते.

अशीच परिस्थिती वरील संवादात उद्भवली आहे. वडिलांना माझी मुलगी सासरी सुखात असावी हीच अपेक्षा असते. त्यांची अपेक्षा सार्थ आहे परंतु सासरी ती कुठे चुकली, खरंच जावयाने तिला मारलं का? या गोष्टीची शहानिशा करणे गरजेचे आहे. आजकाल फारकत घेण्याचं प्रमाण खूप वाढलं. तेही लग्न झाले की वर्ष-दीडवर्षाच्या आतच फारकत घेतांना दिसतात. का? लग्नानंतरचे काही महिने जवळपास तीन -चार महिने एकमेकांना समजण्यात आणि प्रेम उफाणलेला असतो कदाचित यामुळे लवकर आणि तणावरहित संपतात. नंतर मात्र मुलाची अपेक्षा अशी असते की आता बायकोने घरातील कामे आणि आईवडील यांच्याकडे लक्ष द्यावे. परंतु हे तिला कुठेतरी खटकतं आणि मी यांचेच का ऐकायचं? मीच का काम करायचे? मग नवऱ्याने काम महत्त्वाचं आहे म्हटलं की, इतक्यातच हा मला महत्त्व देत नाही. माझ्याकडे दुर्लक्ष करतो, असे विचार मनात येतात.

शेवटी वितंडवाद, गैरसमज, भांडण वाढत जातात आणि शेवटी माझी मुलगी फारच दुःखात आहे. तिला तिथे कुणीच समजून घेत नाही, असे म्हणत लग्नाच्या वर्षाकाठी फारकत होते. काहीवेळा मुलीला कामे जमत नाहीत. अशावेळी तिला अवधी देणे गरजेचे आहे. पण हे सर्व घडत नाही आणि वेगळंच घडतं. फारकतचं कारण म्हणजे सासू-सासरे, दीर यांच्यापासून वेगळं राहणं हेही असू शकतं. न्यायमूर्ती मृदुला भाटकर म्हणतात, ‘शारीरिक हिंसेच्या चार पाच तरी केसेस दिवसाला असतात. खरोखर हिंसा केलेली असते का? कारण, पुष्कळ वेळा निव्वळ पोटगीसाठी फारकतची याचिका कोर्टात दाखल केली जाते. अशाप्रकारे फारकत मुलगी/मुलगा कुणीही घेत असेल तर खरं खोटं आपल्या स्तरावर पडताळून बघणं आवश्यक असतं. जर गोष्टी खरंच खूप हाताबाहेर गेलेल्या असतील, सुधारणेपलीकडे असतील तरच मग फारकतीशिवाय पर्याय नसतो.

गैरसमज आणि नकारात्मकता
हळूहळू पुढे जाते सरकत,
हिंसा डोईजड होऊन आत्महत्येपेक्षा
लवकर घेऊन टाकावी फारकत.’

कु.संगिता रामटेके/भोवते
साकोली, भंडारा
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे