Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

देवांवर श्रध्दा

0 4 8 2 9 0

देवांवर श्रध्दा

देवावर श्रद्धा ठेवावी, अंधश्रध्दा नको’. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली काळजी घेतो. आपल्याला वेळच्या वेळी आठवण करून देतो. तुझे हे काम राहिले. हे काम झाले. आपण सुखातच देवाची आठवण करत नाही. दुखात मात्र सतत आठवण करतो. माणूस देवाच्या चरणी लीन होतो, याचा अर्थ तो दुबळा असतो असं घेणं अज्ञान आणि बालीशपण प्रगट करणं असं नाही. वैद्यकिय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित व्यक्ती रुग्णावर सर्वोच्च उपाय केल्यानंतर अंतिम श्रेय परमपित्या ईश्वराला देते ही त्याची हतबलता नसते, तर ईश्वरीय ऊर्जेचा साक्षात्कार त्याला झालेला असतो. देव मानणं, देव आहे, त्याचं अस्तित्व स्वीकारणं आपल्या चांगल्या कृतीचं श्रेय देवाला देणं हे दुबळेपणाचं नव्हे तर सबलतेचं लक्षण आहे. समजदारीचं चिन्ह आहे.

एक प्रकारे आपला अहंकार बोथट होणं, ही अवस्थाही देवाचं अस्तित्व स्वीकरण्यात फार मोठी भूमिका बजावते. आपली पवित्र निश्चल धारणा आणि अखंडित धैर्य या दोन गुणांच्या समुच्चयाने आपली रोजची वाटचाल सहज होणारी आहे. आयुष्य चांगल जगण्याचे रस्ते खूप आहेत. चुका करण्यासाठीच काहीतरी वेगळं करावं लागतं. आणि बऱ्याच लोकांना वाटत असतं आपण चुका करून शिकतो. म्हणजे आपण क्रिएटिव्ह लाईफ जगतोय ! सर्जनशीलता चांगल काम अधिक चांगल होईल या विचार धारेतून निर्माण होते एवढं आपण लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे !

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा जिल्हा धाराशिव
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे