‘माँ साहेब’ एक तेजस्वी बाणा..!!!
भुमेश्वरी सातपुते खोंडे ता. उमरेड, जि. नागपूर

‘माँ साहेब’ एक तेजस्वी बाणा..!!!
आमच्या आईचे नाव जिजाबाई. आम्ही त्यांना माँसाहेब म्हणायचो. माँसाहेबाचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. माँसाहेबांना चार भाऊ होते. लखुजी राजांनी मुलाबरोबरच मुलीला जिजाऊलासुद्धा युद्धकलेचे व बौद्धिक शिक्षण दिले. त्यामुळे माँसाहेब लहानपणापासूनच युद्धकलेत निपुण होत्या. मालोजीराव भोसल्यांचे पराक्रमी सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी १६१० साली देवगिरी येथे लखुजीराजांनी जिजाऊचा विवाह लावून दिला. त्यावेळी आमचे वडील शहाजीराजे हे पुणे सुपे चाकण बारामती या परगण्याचे राजे होते. ‘ज्यांच्याकडे शहाजीराजे त्यांचा विजय’ अशी भारतीय राजकारणाची स्थिती होती. पण आपले स्वतंत्र राज्य असावे हे शहाजीराजांचे ध्येय होते आणि या ध्येयाच्या पूर्तीसाठी माँसाहेब शहाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या.
माँसाहेब या काही सामान्य स्त्री नव्हत्या. लखुजीराव जाधवासारख्या बलाढ्य सरदाराच्या त्या कन्या आणि शहाजीराजा सारख्या बलाढ्य सरदाराच्या पत्नी होत्या. राजकारणाचे आणि युद्धनीतीचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठायी एकत्र आली होती. त्या स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठी सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याची चीज नव्हती. यांचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशहाने भरदरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती; त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. म्हणूनच माँसाहेबांनी निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्याची चाकरी करणार नाही. तो स्वतःचा आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल. या विचारानेच त्या आम्हाला घडवत होत्या, आम्हावर सुसंस्कार करत होत्या.
श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब आम्हाला हुरूप येई. त्यांनी सांगीतलेल्या राम, कृष्ण, भीम, अर्जुन लोकांना खूप सुखी करू शकशील. या माँसाहेबांच्या उपदेशाने स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आम्हीही लढावे, या वीरांच्या गोष्टी आम्हाला आठवत. हे वीर पुरुष आम्हाला ध्यानीमनी त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपणही करावा, त्यांनी प्रजेला सूखी केले तसे आपणही करावे, आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे आम्हाला वाटू लागले. आणि एक दिवस आम्ही आमच्या काही मावळ्यांना घेऊन रायरेश्वराला साक्षी ठेवून स्वराज्य स्थापण्याची प्रतिज्ञा केली. हा प्रसंग आम्ही जेव्हा माँसाहेबांना सांगीतला तेव्हा त्या माउलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते शिवबा पूर्ण करणार अशा विश्वास त्यांना वाटू लागला.
ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य म्हणूनच आम्ही तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि पाहता पाहता माँसाहेबांच्या डोळ्यांनी बघितलेल्या स्वराज्याचे दिव्यस्वप्न आमच्या हाताने या मातीत रूजलं नी मावळ्यांच्या रक्त आणि घामाच्या सड्यांनी सह्याद्रीच्या कड्याकपारीत फोफावलं. गड, किल्ले जिंकताना, मोहीम फत्ते करताना आमच्यासोबत माँसाहेबाची संस्कार शिदोरी सतत असायची. आम्ही स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो यामागे माँसाहेबांचा फार मोठा त्याग आहे. आपल्या पोटच्या गोळ्याला युद्धावर पाठवताना एका मातेच्या काळजाला होणाऱ्या वेदना फक्त एक माताच समजू शकते.
अफजल खान वधाचा प्रसंग, आग्रामधील संभाजीसह आम्हाला झालेली कैद यासारख्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अनेक घटना घडताना माँसाहेबांच्या मातृहृदयाची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच करवत नाही. माँसाहेब फक्त आमच्याच आई नव्हत्या तर संपूर्ण स्वराज्याच्या आई होत्या. त्यांनी आमच्याबरोबरच संपूर्ण स्वराज्याची काळजी वाहिली.
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड, जि. नागपूर
=======



