Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

सागरगड -माची रस्त्यासाठी N.I. R. D.C. कडून २३ कोटी रुपयांची शक्यता

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 5 7 8 4

सागरगड -माची रस्त्यासाठी N.I. R. D.C. कडून २३ कोटी रुपयांची शक्यता

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

रायगड/अलिबाग: (दि ९ मे) तालुक्यातील सागरगड – माची या आदिवासीवाडीच्या रस्त्यासाठी केंद्र शासनाच्या N. I. R, D. A. ( National Integrated Road Development Athority) नवीदिल्ली या विभागाकडून २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्यासाठी प्रकरण जिल्हाधिकारी रायगड यांच्या शिफारशीने प्रकरण दिल्ली येथे पठविले आहे . निधी मंजूर होताच आदिवासीवाडीच्या रस्त्यास त्वरेने सुरूवात केली जाईल , अशी माहिती मुख्यमंत्री सडक योजना रायगड विभागच्या कार्यकारी अभियता सरिता देसाई यांनी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालैकर यांना दिली .

सागरगड – माची येथील आदिवासीवाडी डोंगर – कपारीत वसली असून ती *वन* विभागात मोडते. त्यामुळे या वाडीस रस्ता , वीज , पाणी इ, भौतिक सुविधा पुरविण्यास तांत्रिक अडचणी येत
होत्या . त्या अडचणी दूर होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार *बळवंत वालैकर* २५ वर्षे शासनाबरोबर झगडले.
भौतिक सुविधा मिळण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देण्यासाठी आदिवासींसमवेत मंत्रालयात गेले . जिल्हाधिकारी यांना ही निवेदन दिले. त्याबाबत कार्यवाही होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले . राष्ट्रीयदिनी जिल्हाधिकारी कार्रालयासमोर आदिवासींसह लाक्षणिक उपोषणे केली. प्रकरणाला गती येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय , कोकण भवन , मंत्रालय (मुंबई ) एवढेच नव्हे तर *नागपूर*[येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्रुटीँबाबत चर्चा केली. नियमानुसार *वन* जमिनीचे De forastatinn झाल्यानंतर भौतिक सुविधांसाठी *१० एकर* जमीन *जा.क्र. बी / २० / जमीन / वनहक्क ४४३१ / २०१३ -१४ वन विभाग अलिबाग दि. २९ / जानेवारी २०१४* नुसार
* आदा केली गेली .
* ज्येष्ठ पत्रकार *बळवंत वालेकर* यांच्या सातत्यपूर्ण चिकाटीमुळेच सागरगड – माची येथील भौतिक सुविधांसाठी १४ जमीन शासनाकडून *मोफत* मिळाली . याबाबत तत्कालीन आदिवासी विकास मंत्री अंँड.
* . *गैविंदराव चौधरी ,* जिल्हा परिषद अध्यक्ष *पंडितशेट पाटील* , जिल्हाधिकारी
* *डाँ. निपुण विनायक* (I, A, S, ) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी *विश्वास भोसले* ( I. A, S ) यांनी
* , )अधिक्रुत पत्राद्वारे अभिनंदन केले.

राजभवनचे दार ठोठावले सागररगडच्या आदिवासी वाडीस Forest कडून भौतिक सुविधा देणेबाबत हिरवा कंंदिल मिळताच , जिल्हा नियोजन समितीने रस्ता बांधण्यास ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही मिळाली . पण पुढील कार्यवाहीबाबत जिल्हा प्रशासन निष्क्रिय होते . शेवटी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी राजभवनचा दरवाजा ठोठावण्याचे ठरविले. राज्यपाल हे पद संवैधानिक असल्यामुळे सहसा भेट मिळत नाही . पण पत्रकारितेच्या अस्त्रामुळे तत्कालीन राज्यपाल महामहीम कोश्यारी यांची भेट घेणे शक्य झाले रस्त्याचा पूर्वेतिहास हिंदीमध्ये विशद केल्यानंतर महोदयांनी निवेदन स्वीकारले. सोबत समाजरत्न मनोहर पाडगे होते. निवेदन स्वीकारल्यानंतर राज्यपाल महामहीम
* *कोश्यारी* यांनी “रस्त्याचा निधी त्वरित खर्च करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांना दिले . पण – – – ?
* मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रायगडने N. I. R, D. A. नवीदिल्लीकडे पठविलेले प्रकरण यशाची होवो , हीच अपेक्षा .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 7 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे