प्रकल्पग्रस्तांनी मदत व पुनर्वसन मंत्री आशीष जयस्वाल यांना दिले मागणीचे निवेदन
रजत डेकाटे, मालेवाडा प्रतिनिधी
प्रकल्पग्रस्तांनी मदत व पुनर्वसन मंत्री आशीष जयस्वाल यांना दिले मागणीचे निवेदन
मंत्रालयात या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बैठक
रजत डेकाटे, मालेवाडा
बिनधास्त न्युज नेटवर्क
नागपूर/ भिवापूर: गोसेखुर्द प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना अजूनही शेतीचा मोबदला व सोई सुविधांची गरज भासत आहे. ही एक प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी शोकांतिका आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी हा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करेल हा प्रश्न मात्र कायमच चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणाची दखल घेण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांची रामटेक येथे भेट घेत प्रमुख मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.
जयस्वाल म्हणाले लवकरच प्रकल्पग्रस्तांची या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मंत्रालय पातळीवर बैठक लावणार असल्याचे यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. प्रकल्पग्रस्तांनी नागरिकांनी 22 गावांचे पुनर्वसन 2013 च्या कायद्यानुसार पुनर्वसन करावे, पूरग्रस्त पुनर्वसन भागात 22 गावांना मान्यता नाही, बऱ्याच पुनर्वसन गावात नागरी सुविधा व अपुऱ्या आहेत, प्रकल्पग्रस्तांना 2013 मध्ये ज्या भूसंपादन कायद्यानुसार दहा लाखांचा पॅकेज सरसकट वाटप करण्यात यावा, आमच्या गावाच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्या असे एक ना अनेक मागण्यांचे निवेदन मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांना प्रकल्पग्रस्तांनी दिले.
यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे व शासकीय सदस्य भाऊ कातोरे अतुल राघोवते, मनीषा भांडारकर, प्रमिला शहारे रोशन भंडारकर ,सैग कोहपरे, संजय मते,राजेश आजबले, आशिष कांबळे ,विलास भोयर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिक्रिया
गोसेखुर्द प्रकल्पाला 40 वर्षांचा कालखंड लोटला असून आमची एक पिढी अक्की उध्वस्त झाली आहे. न्यायासाठी कोर्टात चकरा मारत आहेत. कुटुंब वाढ,सबेरोजगारीचा मुद्दा वाढला असून ज्यामुळे लग्न जुळणे, नैराश्य व व्यसनाधीनतेचा उगम होत आहे. ज्यामुळे आमचा हक्क आयुष्य गोसेखुर्द प्रकल्पाने हिरावून घेतले आहे ही बाब खूप गंभीर आहे. आशा करतो की या बैठकीच्या माध्यमातून तरी आमचे प्रश्न मार्गी लागतील अन्यथा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त बांधव आक्रमक होऊन कोणत्याही दिशानी आंदोलनाची ठिणगी पेटवू शकते.
कृष्णाजी घोडेस्वार
माजी उपसभापती पं. स. भिवापूर तथा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त सालेभट्टी पुनर्वसन ता.भिवापूर





