
0
5
7
8
9
7
मशाल पेटती ठेवा
अन्यायाच्या अंधाराला
आता तुम्ही ललकारा!
मशाल पेटती ठेवा..
क्रांतीची मशाल घेतली
उपोषणाने देह खाली पडले
इतिहास जागता ठेवा
मशाल पेटती ठेवा..
तेवत ठेव हक्काचा लढा
हुकूमशाहीला घाल वेढा
नवा इतिहास रचून दाखवा
मशाल पेटती ठेवा..
ज्या वाटेने क्रांती चालली
तरूणांची ताकत कळली
शासनाने न्याय दयावा
मशाल पेटती ठेवा..
शिका संघटन संघर्ष मंत्र
बाबासाहेबांचे मुल तंत्र
युवकांनो लक्षात ठेवा
मशाल पेटती ठेवा..
होऊ आम्ही अजिंक्य
येऊ न देऊ परकीय
लोकशाहीचा वसा घ्यावा
मशाल पेटती ठेवा..
रंजना राहूल ब्राम्हणकर
अर्जुनी/मो.जि.गोंदिया
0
5
7
8
9
7



