
0
5
4
7
7
9
शब्दांजली
मुकेश,रफी,किशोर,लता,
आधीच गेले होते सूरमनी
आता आशाच्या रूपाने,
पूर्णत्व आले स्वर्गभूवनी..//
सूनी सूनी वाटली असेल
देवादिकांना तिथे मैफिल
म्हणून का हे पाचवे रत्न
केले असेल त्यांनी हशील.. //
म्हणू धरतीचे ह्रदयस्पंदन
की नभातली श्रावण सर
कणा कणात मना मनात
अमर आशाचे दिव्य स्वर.. //
पहाट व्हावी तुला ऐकत
तुलाच ऐकत झोपी जावे
हे आनंदयात्री तुझे गाणे
उदासीचे मळभ दूर व्हावे..//
जोवर सूर्य, चंद्र, नभात
तोवर तुझी मनात गाणी
विनम्र अर्पण शब्दांजली
ही निःशब्द बापुडी वाणी.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
5
4
7
7
9



