Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचारोळीदादरा नगर हवेलीदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरनाशिकपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“मतदान म्हणजे केवळ बटण दाबणे नाही, तर प्रामाणिक आणि विवेकाचा निर्णय”; प्रशांत ठाकरे

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 4

“मतदान म्हणजे केवळ बटण दाबणे नाही, तर प्रामाणिक आणि विवेकाचा निर्णय”; प्रशांत ठाकरे

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

कोणत्याही युद्धात कोण हरले? कोण जिंकले? यापेक्षा मानवतेचा विजय हाच खरा विजय असतो, याबाबत मी निःशंक आहे. फक्त प्रश्न हाच आहे की, रणांगणात आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत. खऱ्याच्या की खोट्याच्या, न्यायाच्या की अन्यायाच्या, विवेकाच्या की वर्चस्वाच्या? रणांगण….अर्थात “मैदान-ए-जंग”. म्हणजे केवळ रणभूमी नाही. जिथे संघर्ष आहे, तिथे ते मैदान उभे राहते. काळ, स्वरूप आणि साधने बदलली, तरी लढाईचे स्वरूप कायम आहे. राजकीय मैदान-ए-जंग: ज्यात निवडणुका म्हणजे लोकशाहीतील रणांगण. सामाजिक मैदान-ए-जंग: समता विरुद्ध अन्याय, परंपरा विरुद्ध परिवर्तन हा संघर्ष आजही समाजात कायम आहे.

धार्मिक मैदान-ए-जंग: आस्था विरुद्ध अंधश्रद्धा, सह अस्तित्व विरुद्ध कट्टरता हा संघर्ष कित्येकदा धोकादायक असतो. आर्थिक मैदान-ए-जंग: श्रीमंत विरुद्ध गरीब,भांडवल विरुद्ध श्रम ही लढाई अदृश्य पण तीव्र आहे. इथे नफ्याचा विजय होतो, कधी माणूस हरतो. शैक्षणिक मैदान-ए-जंग: स्पर्धा विरुद्ध गुणवत्ता, गुणांक विरुद्ध ज्ञान…आजचा विद्यार्थी या रणांगणात अडकलेला आहे. डिजिटल मैदान-ए-जंग: हा आजचा सर्वात वेगवान रणांगण. ट्रोलिंग, फेक न्यूज, सायबर हल्ले शब्दच इथे शस्त्र आहेत. वैयक्तिक (अंतर्गत) मैदान-ए-जंग: स्वार्थ विरुद्ध मूल्ये, भीती विरुद्ध धैर्य ही लढाई प्रत्येकाच्या मनात चालू असते.हा जिंकणारा माणूसच खरा विजेता.

रसिक सृजनहो…सर्वांनी नुकताच नगर पालिकांच्या निवडणुकांमधला मैदान-ए-जंग पाहिला आता वेळ आहे महानगरपालिकेची…!! उपक्रम, विकास आणि लोकहित यांची चर्चा व्हावी अशी अपेक्षा असलेली आगामी महानगरपालिका निवडणूक आज मैदान-ए-जंग बनत चालली आहे. ही लढाई केवळ उमेदवारांमध्ये नाही तर ती विचारधारांमध्ये, घोषणांमध्ये, भावनांमध्ये आणि मतदारांच्या मनात सुरू आहे. शस्त्रे बदलली आहेत घोषणापत्रे, पोस्टर्स, सोशल मीडिया, सभांची भाषणे पण युद्धाची धार तितकीच तीव्र आहे.

या रणांगणात राजकीय पक्ष आपापल्या रणनीती आखतात. समीकरणे जुळवतात, पण नागरिक हा केवळ मत देणारा सैनिक ठरतो की, सजग सेनापती हा खरा प्रश्न आहे. “मतदान म्हणजे केवळ बटण दाबणे नाही, तर प्रामा

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे