Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्र

अलिबाग पोष्टात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य मिळणार

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 7

अलिबाग पोष्टात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य मिळणार

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग (दि. २७) सिटीझन चार्टर पोष्टल फोरम रायगड विभाग अलिबागची त्रैमासिक सभा हेड पोष्ट आॕफिस अलिबाग येथे हेडपोष्टमास्तर सौ.निलीमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या सभेस ज्येष्ठ पत्रकार तथा सदस्य बळवंत वालेकर , निव्रुत्त मुख्याध्या पक राम शिंदे , असि. पोष्टमास्तर प्रकाश पाटील , डाक अधिक्षक रायगड विभागचे प्रतिनिधी मिलिंद पाटील इ. उपस्थित होते. प्रारंभी हेड पोष्टमास्तर यांनी स्वागत केले तर मिलिंद पाटील यांनी आभार मानले. मागील सभेच्या इतिव्रुत्तांताचे वाचन केल्यानंतर पोष्टाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. राज्य शासनाच्या “लाडकी बहीण ” मानधन वाटपापैकी K, Y, C, “पात्र” महिलांच्या संख्येनुसार वाटप करण्याबाबत विचार असल्याचे सांगितले .

या सभेत पत्रकार तथा फोरम सदस्य बळवंत वालेकर यांनी पुढील प्रश्न विचारले. ( १)अलिबाग हेडपोष्ट आँफिस हे जिल्हा मुख्यालयात असल्यामुळे शासकीय कार्यालये भरपूर आहेत . म्हणून सर्व खिडक्यांसमोर ग्राहका़ची गर्दीच गर्दी असते. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना व व्यंगिष्ठांना प्राधान्य देण्याची व्यवस्था होईल का ? तसेच काही खिडक्यांवर अमराठी कर्मचारी कार्यरत असतात . त्यांना मराठी कळत नाही अगर ते मराठी भाषा समजावून घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत . परिणामी ‘ ग्राहकांचा ” गोँधळ होतो . . म्हणून महत्त्वपूर्ण खिडक्यांवर मराठी भाषिक कर्मचारी बसवावेत.

याबाबत खुलासा करताना हेडपोष्ट मास्तर म्हणाले ” महत्त्वपूर्ण खिडक्यांवर मराठी भाषिक कर्मचारी बसतात . अन्य ठिकाणी कर्मचा-यांच्या संख्येनुसार व्यवस्था केली जाईल . (२) सकाळी ८ ते रात्री ८वाजेपर्यंतच्या कार्यालयीन वेळेबाबत स्पष्टीकरण करताना हेडपोष्ट मास्तर म्हणाले ” ग्राहक सर्वसाधारणपणे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पोष्टात येतात म्हणून सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच ग्राहकांना सेवा देण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर चालू आहे . त्यानंतर कामकाज संपल्याचे सभाध्यक्षांनी जाहीर केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे