0
4
8
2
9
7
बंधनात मी
माझेच आयुष्य मला
नियमबद्ध वाटले आजवरी
बंधनात मी एकटीच
जणू या सृष्टीवरी…
सूर्य म्हणाला…
मला ही बंधन वेळेचे
तिमिरातून तेजाकडे जाण्याचे…
चंद्राला तरी मिळते रजा
अमावस्येच्या रात्रींना
तोही तत्पर साक्षी होण्या
दिल्या घेतल्या वचनांना..
ऋतुचक्र म्हणाले…
ठरलेला काळ आमचाही
प्रत्येकी महिने चार…
मानवाच्या हस्तक्षेपामुळे
हल्ली पाऊसाचा वाढलाय
लहरीपणा फार..
मानव सोडला तर..
निसर्गही नियमात जगतो
बंधनात मी म्हणत
मानवच अमानुष वागतो..
अंतर्मुख होता मन माझे
मीच जरा ओशाळले..
क्षणभंगूर जीवनात
दुःख च गिरवीत राहिले..
मिळाल्या श्वासांचे महत्व कळाले
सकारात्मक दिशेस पाऊल वळाले
बंधनात मी,पण स्वच्छंदी जगेन यापुढे..
नतमस्तक मी सदैव निसर्गापुढे..!
नतमस्तक मी सदैव निसर्गापुढे..!
सौ.संध्या मानिज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
========
0
4
8
2
9
7



