अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारीत ‘देवी’ या एकल नाट्याचा ९ मे रोजी शुभारंभ
संस्कार भारतीचा उपक्रम
अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारीत ‘देवी’ या एकल नाट्याचा ९ मे रोजी शुभारंभ
संस्कार भारतीचा उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे.दि.5 (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
संस्कार भारती, पुणे यांच्या ‘ स्नेह ‘ या नाट्य संस्थेने *देवी* या एकल नाट्याची निर्मिती केली असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग, शुक्रवार दि. ९ मे २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता कोथरूडच्या मयूर कॉलनीतील एमईएस सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या नाट्यरूपाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिध्द अभिनेते योगेश सोमण यांनी केले असून नाट्य प्रस्तुती रश्मी देव करणार आहेत. अहिल्यादेवींची एक आदर्श राज्यशासक म्हणून ईतिहासात नोंद आहे. त्यांचे कुशल नेतृत्वं, धडाडीचे कर्तृत्व, अचूक न्यायदान, राजनिती आणि रणनितीची चाणक्षता, प्रजावत्सलता असे सारे गुण जपत जीवनभर कर्तव्यकठोर आचारण करणा-या या कर्मयोगिनीला कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी संस्कार भारती, (पश्चिम प्रांत) यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सिनियर कॉलेज, पुणे यांच्या सहकार्याने या नाटकाची निर्मिती केलेली आहे.
पुणे महानगराच्या वर्धापन दिन प्रसंगी आयोजित या अनोख्या नाट्य अविष्काराचा अनुभव घेण्यासाठी रसिकांनी आवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रम निमंत्रक पुणे महानगर संस्कार भारतीचे अध्यक्ष, पं.अतुलकुमार उपाध्ये आणि
मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य, डॉ. रवींद्र वैद्य यांनी केले आहे.
मोफत प्रवेशिकांसाठी संपर्क:
*मैत्रेयी बापट* – 98225 26343
*कुशल* – 70669 48711
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण:
मएसो सीनियर कॉलेज, १३१, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे (सकाळी १०.०० ते ३.००)



