0
4
8
3
0
0
दोस्तीत कुस्ती
निवडणूक लढतांना
दोस्तीत कुस्ती
निवडून येताच
करतात मस्ती
राजकीय पक्ष हा
एकाच माळ्याचा
राजकीय क्षेत्रात
असतो कई काळाचा
एकमेक करतात विरोध
फक्त लोक दिखावसाठी
बसतात एकाच पंक्तीत
बांधतात पैशाच्या गाठी
दोस्तीत नसते कुस्ती
ती असते पार्टीची मस्ती
चालतात एकाच मार्गाने
राहतात मस्त आनंदाने
जनतेचे असते बेहाल
आपण होतात मालामाल
घेतात मस्त डकार
लोकांना देतात होकार
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
0
4
8
3
0
0



