आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध
माझी कविता! कृष्णाची गीता!
डॉ. अविनाश प. परांजपे वानाडोंगरी, जि.नागपूर

0
5
7
8
9
8
माझी कविता! कृष्णाची गीता!
माझी कविता आत्मबद्ध
कृष्णाची गीता जगत वंद्य!
माझ्या कवितेत असेल काही
सांगितले जे गीतेने! पण गीता मात्र
सांगू नाही शकत, “माझी कविता!”
माझी कविता! कृष्णाची गीता!
मी, माझी, माझं काहीच नसतं म्हणते गीता!
म्हणूनच गीतेचा आहे विरोध
कविता ‘ माझी’ म्हणण्याला!
‘ माझी’ कविता मात्र सांगतेय,
‘ गीता’ पण माझी म्हण!
जोड हृदयी कृष्णाला, कल्याणा करीता!
माझी कविता! कृष्णाची गीता!
गीतेत आहे, कर्म – मानवाचे!
ज्ञान – विश्वाचे! भक्ती ईश्वराची!
योग – तपस्व्यांचा! मुक्तीसाठी!
माझ्या कवितेत आहे,
एक हळुवार फुंकर, जखमेवर
एक कोमल स्वर, संगीताचा!
एक शीतल विसावा, हृदयाचा!
एक पुसट ओलावा, आसवांचा! प्रीती साठी!
तरीही निश्चितच श्रेष्ठतम! कृष्णाची गीता!
” माझी ” कविता???????
डॉ. अविनाश प. परांजपे
वानाडोंगरी, जि.नागपूर
========
0
5
7
8
9
8



