आज २ सप्टेंबर, लेखक वि. स. खांडेकर स्मृतिदिन
संपादकीय
आज २ सप्टेंबर, लेखक वि. स. खांडेकर स्मृतिदिन
जन्म – ११ जानेवारी १८९८ (सांगली)
स्मृति – २ सप्टेंबर १९७६ (मिरज)
वि. स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. ते मराठी कादंबरीकार नि लेखक होते. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटका मध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स. खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंत:करणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. ललित भाषा रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख आणि तेजस्वी. लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता त्यांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स. खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. १९२० साली खांडेकरांनी शिरोडे या गावी (सिंधुदुर्ग) शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्यातील निरनिराळ्या प्रकारांमध्ये मोलाचे योगदान दिले. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीका टिपण्या लिहिल्या. *पुरस्कार*- साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) ययाति कादंबरी साठी; ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) ययाति कादंबरी साठी. *पुस्तके*- ययाति, हृदयाची हाक, कांचनमृग, उल्का, दोन मने, हिरवा चाफा.



