0
4
8
3
0
1
मायेचा ओलावा
मैत्रिणींच्या मेळाव्यात आज जरा रमले
मायेच्या सावलीत जरा विसावले…
मायेची सावली होती माझ्या मैत्रिणींची
पावसाची बरसात आणि साथ आनंदाची…
मायेची ही पाखरं खूप दिवसांनी एकत्र आली
गप्पागोष्टींच्या नादात जगाच भान विसरली…
कोण काय म्हणेल? याकडे अजिबात लक्ष नाही
विसाव्याच्या क्षणात करुन घ्यायचे सर्व काही….
जग चालले पुढे आपण ही चालायचे त्या वाटेने
जीवनी फुलवायचे आनंदाचे क्षण एकमेका साथीने…
मन होईल तसे वागायचे, राहायचे
यापुढील जीवन आनंदाने जगायचे, आनंदाने जगायचे….
वसुधा वैभव नाईक, पुणे
0
4
8
3
0
1



