जे. एस. एम. महाविद्यालया विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटप
तुषार थळे, प्रतिनिधी रायगड
जे. एस. एम. महाविद्यालया विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटप
तुषार थळे, प्रतिनिधी रायगड
अलिबाग: संपूर्ण भारतात स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला जात आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निर्देशानुसार सर्वत्र हर घर तिरंगा अभियान राबाविण्यात येत आहे. जे. एस. एम. महाविद्यालय व अॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा अभियानांतर्गत नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकविण्यास सांगणे, स्मारकांची स्वच्छता, महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करणे, तिरंगा रॅली काढणे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यापैकी आज अलिबाग मधील सरखेल कान्होजी आंग्रे समाधी पारसर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, अॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेज च्या प्रभारी प्राचार्या अॅड. नीलम हजारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, प्रा. अदिती दामले, लॉ कॉलेजचे शिक्षक अॅड. चिन्मय राणे, अॅड. कौशिक बोडस, अॅड. सुरज पुरी, शिक्षकेतर कर्मचारी निखिल माळी आणि एन एस. एस. स्वयंसेवक व अॅड दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या डी. एल. एल. ई. चे विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम विदयार्थ्यांनी सरखेल कान्होजी आंग्रे समाधी परिसर स्वच्छ केला. त्यानंतर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले व उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी आभिवादन केले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रत्येक नागरिकांने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे निर्देश भारत साकारने दिले आहेत. या अभियानाचा भाग म्हणून आज महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना तिरंगा ध्वजाचे वाटप अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच प्रत्येकाने आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा ध्वज फडकवावा. महाविद्यालयातर्फे दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 7 वा. शिवाजी चौक ते जे. एस. एम. महाविद्यालय अशी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अॅड. गौतम पाटील यांनी केले. सदर हर घर तिरंगा अभियान उपक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. सोनाली पाटील व अॅड. दत्ता पाटील लॉ. कॉलेज च्या प्रभारी प्राचार्या अॅड. नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.





