0
4
8
3
0
0
हास्य फुलवून बघ
एखाद्या दुःखिताच्या चेहर्यावर
हास्य फुलवून बघ ॥
तुलाच श्रमपरिहार झाल्यासारखे वाटेल॥॥॥॥
एखाद्या भुकेल्याची
क्षुधा शमवून बघ॥
तुलाच कृतकृत्य अन
तृप्त झाल्यासारखे वाटेल॥॥॥॥
एखाद्या अनवाणी व्यक्तीला
पादत्राणे घेऊन दे॥
पायांना बसणार्या चटक्यांपासून
त्याला मुक्ती दिल्याचं पुण्य तुला लाभेल॥॥॥॥
तृषिताची तहान भागव
अन नंतर बघ॥
तुझीच तृष्णा भागल्यासारखी
तुला वाटेल॥॥॥॥
अगदीच नडलेल्यासाठी
कधी पदरमोड कर॥
तुला स्वतःचीच नड
भागल्यासारखी वाटेल॥॥॥॥
कमीअधिक प्रमाणात
परोपकार करत रहा॥
दुसर्याच्या कामी येण्याचं
समाधान तुला लाभेल॥॥॥॥
डाॅ.नझीर शेख राहाता
अहमदनगर
0
4
8
3
0
0



