0
4
8
2
8
6
क्षणभंगुर
क्षणोक्षणी बदलतो ,सृष्टीचा नूर
कधी हास्यरंग, कधी दु:खाचा पूर
काजव्यांची आरास, फुलपाखरांचा मधुमास
निमिषात गोठते, तृप्ततेची आस
नवलाईचे कोंदण, कौतुकाचे गोंदण
मनीचे मुक्तांगण, क्षणात लुप्त नभांगण
पहिला मृद्गंध, पाऊसधारांचा वेणू
क्षणापुरताच सजतो, आकाशी इंद्रधनु
विश्वासाने चालावे, कापावे श्वासांचे अंतर
निश्वासांचे विसावे, मात्र क्षणभंगुर
क्षणभंगुर.. क्षणभंगुर.. क्षणभंगुर
स्वाती लभाने, वर्धा
0
4
8
2
8
6



