Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरमहाराष्ट्रविदर्भ

न्यु मून स्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या पर्वावर स्वयंशासनाची अनोखी पर्वणी !

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

0 6 1 1 7 0

न्यु मून स्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या पर्वावर स्वयंशासनाची अनोखी पर्वणी !

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

अर्जुनी/मोर, (दि ११) : न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिनाचा सोहळा उत्साह, कृतज्ञता आणि विद्यार्थ्यांच्या अनोख्या अनुभवांनी रंगला. शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी एक दिवसाची शिक्षकाची भूमिका अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि जबाबदारीने पार पाडली.

कार्यक्रमादरम्यान मंचावर प्रा.सुरज मोटघरे प्रा.तारका रुखमोडे ,प्रतिक्षा राऊत ,निकिता मानापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांचे तसेच शिक्षकाची भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. विद्यार्थीरूपी शिक्षकांनी दिवसभर विविध विषयांचे अध्यापन करताना वर्गशिस्त, विषय मांडणी आणि विद्यार्थ्यांशी संवाद यांचे उत्तम नियोजन केले. शिक्षकाची भूमिका साकारताना आलेला अनुभव विद्यार्थ्यांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरला.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त करताना “शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसून, जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात,” अशा भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून शिक्षकांविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता प्रकर्षाने जाणवली.

याप्रसंगी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या निकिता मनापूरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच ऑलिम्पियाड स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा गौरव करत ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रा. तारका रुखमोडे व प्रा. सुरज मोटघरे यांच्या हस्ते ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’ देऊन निकीता बन्सोड , प्रतीक्षा राऊत आणि प्रवीण नागपुरे यांना गौरविण्यात आले.

यावेळी प्रा.सुरज मोटघरे आणि प्रा.तारका रुखमोडे यांनी आपल्या मनोगतीय मार्गदर्शनातून शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून, त्यांच्या मेहनतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षकांची भूमिका एक दिवस साकारताना त्यांना शिक्षकांच्या जबाबदारीची आणि विद्यार्थ्यांना घडविण्यामागील शिक्षकांच्या मेहनतीची जाणीव झाल्याचे त्यांनी मनोगतातून व्यक्त केले. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांना मानवंदना देत विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि शिक्षकांच्या गौरवाने हा शिक्षक दिन सोहळा आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 7 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे