ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध
१० मार्च – काळोखीरात्र
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी, उमरेड रोड, नागपूर

0
5
1
7
5
8
१० मार्च – काळोखीरात्र
महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई
समाजासाठी फुले दाम्पत्य झटले
शिक्षणाची दारे होती बंद मुलीना
ते द्वार त्यांच्यामुळे खुले झाले
१८४८ शाळा पहिली मुलीची
केली ६ मुलीपासून सुरूवात
समाजकंटका घात आला मनात
हाणून पाडला त्याचा घातपात
झेलले तनुवर चिखलमातीचे वार
बालविवाह, मोडल्या सती प्रथा,
झुगारून दिल्या चालीरिती
जाणिल्या स्त्रीमनाच्या व्यथा
काळाचा घाला होऊन
प्लेगची साथ आली पुण्यात
स्वखांद्यावर गरीबाच्या लेकरांना
नेले यशवंताच्या दवाखान्यात
झाला सावित्री माऊलीला प्लेग
समाजसेवा, सुश्रुषा करता करता
१० मार्च १९८७ ही काळोखीरात्र
उडले प्राणपाखरू पाहता पाहता..
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी, उमरेड रोड, नागपूर
0
5
1
7
5
8



