सिक्युरिटी किती असावी??
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे.

सिक्युरिटी किती असावी??
भावाच्या मुलाचे लग्न चार डिसेंबर रोजी असल्याने आम्ही सध्या सात, आठ दिवस झालं पत्रिका वाटत आहोत. प्रत्येक बिल्डिंग वेगळी, बंगले वेगळे, प्रत्येक चाळ वेगळी, प्रत्येक घराची ठेवण वेगळी,आणि प्रत्येक जणांचे राहणीमानाची पद्धत वेगळी. तसेच प्रत्येकाचे आदरातिथ्य खूपच भावले. कारण एक तर मला कुठे जायला जमत नाही आणि त्यानिमित्ताने मी आता पत्रिका वाटपास माझ्या भाऊ आणि महोदय बरोबर केलेली होते सांगण्याचा मुद्दा हा की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काही ना काही मला साडी किंवा गिफ्ट देण्यात आलं… इथे गिफ्टचा प्रश्न नाहीये पण ते माझ्याबद्दलचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असे म्हणूया.
सांगण्याचा मुद्दा हा की, प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी ही होतीच पण त्या सिक्युरिटीचे प्रकार वेगवेगळे होते कुठे आपण गेटमध्ये गेल्यानंतर सिक्युरिटी आपल्याकडून नाव मोबाईल नंबर लिहून घेत होता. तर कुठे आपला फोटो त्या माणसांना पाठवला जात होता..असे अनेक अनुभव येत आहेत आम्ही कालच्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी मला तिथली सिक्युरिटी जरा घातक वाटली. याचे महत्त्वाचे कारण असे की घरातल्या माणसांच्या थंब शिवाय त्या बिल्डिंगचा दरवाजा सुद्धा उघडला जात नाही आणि लिफ्टचा दरवाजा सुद्धा उघडला जात नाही.
एकतर बिल्डिंग शोधायला बराच वेळ दिला बिल्डिंग शोध लागला तर आम्हाला ते दार उघडला जाईना,समोर लिफ्ट दिसते लिफ्ट मध्ये जायचं कसं?? सिक्युरिटी गार्डला विचारलं सिक्युरिटी गार्ड असे म्हणाला की” त्या घरातल्या व्यक्तीला बोलवा त्यांच्या थंब शिवाय ते दार उघडणार नाही किंवा तुमची लिफ्ट चालू होणार नाही.” झालं परत त्या वयस्कर महिला खाली आल्या आणि मग आम्हाला वर घेऊन गेल्या. पत्रिका देऊन झाली पण नंतर आम्हाला परत खाली येण्यासाठी त्यांना खाली यावे लागले मग त्यांनी त्यावर उपाय काढला की त्यांच्या इथे एक बटण आहे ते बटण त्यांनी दाबलं लिफ्ट चालू केली थंब देऊन आणि खालचा दरवाजा उघडण्यासाठी वरती काहीतरी सिस्टीम होती ते दाबलं तेव्हा ते दार उघडलं पण ते दार उघडताना सुद्धा तीन ते चार मिनिट आमची तिथे गेली.
माझ्या मनात आलं जर का काही इमर्जन्सी कोणाला लागली, घरात अचानक एक वृद्ध माणूस आहे त्याला उठता बसता येत नाहीये तो पडला…काही झालं तर अशा वेळेला इमर्जन्सी सिस्टीम काहीतरी असेलच पण त्या वेळी सुचणे महत्वाचे आहे. मग डोक्यात येऊन गेलं की काय कराव या लोकांनी अशा वेळेला. इमर्जन्सीच्या वेळेला.. जर का आम्हाला पत्रिका देण्यासाठी एवढा त्रास झाला तर,ह्या घरातल्या लोकांना कोणी आलं कोणी गेलं आपल्याकडे तर येणारे जाणारे असतातच ना तर मग प्रत्येक वेळेला हे असं झालं तर किती त्रास होत असेल यांना कारण वयोवृद्ध लोकांना हे सगळं सहन नाही होतं.. सुचतंही नाही.हरकत नाहीये पण एवढी कडक सिक्युरिटी ठेवून चालत नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे. हल्ली लुटमार ही कोणत्याही प्रकारे होत असते.. सिक्युरिटी ठेवणं चांगलेच आहे परंतु माझ्या मनात आले ते मी आपल्याला माझा अनुभव कथन केला. वृद्धांची जपणूक, वृद्धांची काळजी एवढेच मनात असल्याने मनात आले ते लिहिले….!!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे.
========



