सेंट रिंझाई स्कूल येथे वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात
पोलीस निरीक्षक मा. बघेले व संपादक राहुल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
सेंट रिंझाई स्कूल येथे वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात
पोलीस निरीक्षक मा. बघेले व संपादक राहुल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर: सेंट रिंझाई स्कूल, आनंद नगर, बिनाकी मंगळवारी येथील शाळेचे वार्षिक क्रीडा संमेलन २०२५ नुकतेच नागपूर सुधार प्रन्यासच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन यशोधरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. बघेले साहेब व मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष व संपादक राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे प्राचार्य झेनिथ जवादे यांनी पो. नि. मा. बघेले साहेब व राहुल पाटील यांचे शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रशांत सोमकुवर, लुकमान अंसारी, राकेशभाऊ, निलेश भाऊ व विजेता जवादे प्रामुख्याने उपस्थित होते.
क्रीडा संमेलनात नर्सरी ते वर्ग १ ते १० पर्यंतच्या सर्व मुला मुलींचे सर्व क्रीडा प्रकारातील स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व विजेत्या उपविजेत्या स्पर्धकांना राहुल पाटील, प्राचार्य झेनिथ जवादे, विजेता जवादे व मेश्राम सर यांच्या हस्ते मेडल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक समारोहाचे आयोजन येत्या २८ व २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.



