Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

बिजोस्तव

सविता धमगाये ता. जिल्हा नागपूर

0 5 2 4 6 1

बिजोस्तव

इतका आनंददायी असेल कल्पना नव्हती केली. पारंपरिक बी बियाणे जे शेतकऱ्यांनी आस्थेने श्रद्धेने राखून ठेवली. आदिवासींनी पोटाला चिमटा घेऊन जंगलाचे जतन केले. आणि हा ठेवा सामान्यांपर्यंत पोहोचावा म्हणून कृषीउद्योग विभागाने घेतलेला पुढाकार प्रसंशास्पद आहे. बियांचे अनेक प्रकार विशेषतः एकाच पदार्थाचे अनेक वाण बघून तर थक्कच झाले. केरळवरून काही बंधू त्यांचे खास बियाणे घेऊन आलेले. टोमॅटो, मिरची, शेंगा, कोहळे प्रजातीचे इतके सारे प्रकार तर मी पहिल्यांदाच पाहिले.

राजस्थान भागातून आलेले बंधू त्यांच्याजवळ अनेक रानवनस्पतीचे प्रकार आढळून आले. विक्रीसाठी नव्हते तरीही त्यांनी मला त्यातून मोठ्या मनाने दोनतीन बिया काढून दिल्या. खरंच खूप अप्रूप वाटले. तिथे मला श्रुतिका ताई भेटल्या. मुखावरील हास्याने मला त्यांच्याजवळ खिळवून ठेवले. कारंजा लाड ला असणाऱ्या त्यांच्या गोशाळेबद्दल आणि शेतीबद्दल त्या भरभरून बोलत होत्या. मी पण मग मैत्रिणीसाठी नेलेली सदाफुली आणि लाल हादग्याच्या दोन शेंगा देऊन टाकल्या तर त्यांनी त्याबदल्यात एकुलते एक विक्रीसाठी असलेले बेलफळ असेच आनंदाने देऊन टाकले.

कृतज्ञता ही अशीच असते कधी आपण समोरच्याच्या आभारात नतमस्तक होतो कळतच नाही. एक मेळघाटातून आलेल्या ताई त्यांच्याजवळ आल्यासारखे कंद दिसले विचारल्यावर पेवकंद सांगितले. त्यानाही दोन हादग्याच्या शेंगा दिल्या. बोलण्यात खूप आत्मीयता आणि गोडवा. शहद किती प्रकारचे असू शकतात ते तिथे गेल्यावर कळले. अगदी पांढऱ्या रंगाचे शहद सुद्धा तिथे बघायला मिळाले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथे माझी भेट आपल्या समुह आतील शितलताईशी झाली. प्रसन्न वाटले त्यांना भेटून. कंदाचे अळूचे अनेक प्रकार त्याच्याकडे उपलब्ध होते. सदाफुलीचे एक कलम आणि शेंगा देऊन टाकल्या. ओंजळ भरून खजिना घेऊन आली बिजोस्तव मधून. आणि हो एक सांगायचे राहीले पिवळ्या पळसाच्या बिया पण मिळाल्या. लावून ठेवते कुंडीत. तयार झाले की लावेन जमिनीत.

सविता धमगाये
ता. जिल्हा नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे