0
4
8
3
0
0
मनधरणी
रुक्मिणे… आहेस का ग घरी?
म्हटलं निघालीय वारी
लेकरं येती अपुल्या दारी
तुजविणा उणी राहिलीय तयारी
मी तुझा विठुराया, तू माझी सहचरणी
करितो तुझी मनधरणी….
किती ताणशील अबोला
काळ युगांचा लोटला
जीव माझाही आतुरला
घे ग आता तरी घरला
ठायीठायी करितो विनवणी
चाललीय तुझी मनधरणी…
लेकुरे येती बापुडी चालूनिया
तुझ्या माझ्या भेटीला
मला एकट्याला पाहूनिया
जीव त्यांचाही टांगणीला
उगा दोष नको पुंडलिकाला
आत्तातरी रुसवा सोडूनी
येऊ दे घरी.. करितो मनधरणी…
स्वाती लभाने, वर्धा
=======
0
4
8
3
0
0



