0
4
8
2
9
0
भेटणे तुझे माझे
भेटणे तुझे माझे सखे
झाला आता नित्यक्रम,
तुटले सारे भवपाश
दूर अमंगल तो भ्रम..||१||
चल आपल्या भेटीला
नाव आता नवे देऊ,
स्वप्ने एकमेकांची आज
समान वाटून घेऊ… ||२||
हात घेऊन हातात
वाट चालू भविष्याची,
सोबत तुझी माझी
झाली पूर्ण आयुष्याची.. ||३||
सुखदुःखात आपण
सोबत सदा राहू.
आपले उज्ज्वल भविष्य
नवी स्वप्ने आता पाहू.. ||४||
करू निर्मळ मनाने
परस्परांचा आपण स्वीकार,
चल फुलवू आता साजणी
आपला सोन्याचा संसार… ||५||
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
0



