
हरी गुरुजींप्रती …माझा भाव
हरी गुरुजी माझे गुरू, मी त्यांच्या पायाची धूळ,
भाग्यवान मी, लाभले मला ज्ञानाचे ते मूळ।
रक्ताचं नाही, रक्ताच्या पलीकडचं हे नातं,
हरी गुरुजी भेटले मला, देवाच्या रुपातं।
माझं आयुष्य सारं, गुरुचरणी अर्पण व्हावं,
हरी गुरुजींच्या मांडीवरच मरण मला यावं।
माझ्या पाठीशी जेव्हा असतात गुरु माझे,
मग मी फिरायचं नाही कुणाच्या मागे।
ज्याला कळलं गुरूचं खरं महत्त्व जीवनात,
तोच सुखी होतो या सांसारिक जगात।
दिलीत साथ त्यांनी, ते मोठ्या मनाचे गुरू,
त्यांच्यामुळेच मिळाले मला चार चौघात मान भरू।
गुरू नाही माझ्या लोभी मनाचा, नाही कुणाचा,
गुरूच्या वाणीनं घडवला मी स्वतःचा।
गुरूच्या ज्ञानानं झालो एवढा मोठा,
ज्ञानाच्या सागरात तरी शिष्य मी लहानसा छोटा।
तुमच्यामुळे शिकलो मी प्रवचनाची सेवा,
प्रेमाची शाल तुम्हीच ओढली माझ्या खांद्यावरचा मेवा।
शिक्षण-संस्कार जपतो मी जीवापाड,
तुमच्या नावाला लागणार नाही कलंक हा सखोल ठाव।
जन्मोजन्मी लाभो तुमचा भाऊपणाचा स्नेह,
ज्ञानसागरात तुमचा शिष्य राहो नेहमीच नेह।
ज्यांच्या रुपात मी देव पाहिला,
त्यांच्या महिमेचं गाणं आयुष्यभर गात राहिला।
रक्तानं जरी धुतले तुमचे पाय,
तरी फिटणार नाही उपकार तुमचे कधीच आय।
समाजात मिळतो मला मान,
तो तुमच्याच कृपेचा अनमोल दान।
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
जिल्हा धाराशिव





