0
4
8
2
9
0
पाऊसधारा
श्रावणात घन निळा बरसला
परीसर सारा हिरवाकंच झाला
वसुंधरेने जनू हिरवा शालू परिधान केला
रस्तोरस्ती डराव डराव येतो ऐकायला !!
पावसामुळे शेतकरी सुखावला
शेती कामात व्यस्त झाला
चिखल पाणी करु लागला
रोवण्याचा हंगाम जोमाने सुरू झाला!!
नदी नाले ओढे पाण्याने भरली
वाहतुकीची जिकडे तिकडे कोंडी झाली
अनेक गावे पुरावे वेढली
जवळची गावे दुरावली गेली!!
झाडं झुडपे चिंबचिंब भिजली
पशुपक्ष्यांची पंचाईत झाली
ओढे नाले खळबळ वाहू लागली
बच्चे कंपनी आनंदी झाली!!
गावात कागदी बोट वाहू लागली
मुल मुली मस्त पावसाने भीजू लागली
डबक्यात नाचू गाऊ लागली
पावसामुळे मजाच मजा आली.
अनिल मेश्राम
सौंदड जिल्हा-गोंदिया
0
4
8
2
9
0



