
0
4
0
9
0
3
आईचा पदर
आईचा पदर ममतेची आरास
तीच जन्मदात्री, जन्म जगतास
मरणासाठी कारण अनेक
जन्मासाठी साठी फक्त आई एक!!१!!
मायेची सावली ,आईचा पदर
प्रत्येक माऊलीचा व्हायला हवा आदर
आई स्वतः जरी असे निरक्षर
तिनेच शिकविले बोलायला अक्षर!!२!!
काळजी तिची जगावेगळी
तिच्यावरच अवलंबून सगळी
नाही देव कुणी पाहिला
आईच दैवत आहे पहिला!!३!!
आई असते तोवर असते माया
सुख दुःखाची तिच एक छाया
जेंव्हा दुःखाशी होतो सामना
आईच्या कुशीत क्षमते वेदना!!४!!
निर्व्याज प्रेम फक्त आईच करते
अडचणीच्या वेळी हात ती धरते
ती निघून जाता, तिचे प्रेमच उरते
ती सावली होऊन भोवती फिरते!!५!!
सुरेखा चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
========
0
4
0
9
0
3





