0
4
8
2
9
7
प्रेमरंग
प्रेम तुझे रे कसे सांग साजणा
प्रेम तुझे कि अंगावर गोड शहारा
प्रेम कसे तव कि हा गहिवर ओला
प्रेम तुझे जणू अथांग सागर गहिरा
प्रेमरंग हा मनास व्यापून उरला
सांजरंग जणू क्षितीजाला गवसला
भावरंग हा गंधाने दरवळला
भावभरा स्पर्शची मनास ओला
प्रेमरंगी मनमयूर पुलकित झाला
रानीवनी वासंतिक सजे सोहळा
तव मिठीत फुले धुंद सुगंधमळा
राधेचा तू रे शामसखा सावळा
सप्तरंग हे प्रेमरंगातून उजळले
जगी साऱ्या प्रीतीचे दीप जेवले
तू माझा अन् तुझी मी झाले
स्वरनाद दशदिशात हे घुमले
जगण्याला अर्थ माझिया आला
अंगणी चांदणसडा हा शिंपिला
प्रीती ही सुरात न्हाली दिवाणी
तू राजा दिलदार तुझी मी राणी
वृंदा(चित्रा)करमरकर
ता.जिल्हा सांगली
0
4
8
2
9
7



